For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील शाळा गजबजणार 31 मे पासून

10:35 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील शाळा गजबजणार 31 मे पासून
Advertisement

शिक्षण खात्याची तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत-गोड जेवण देण्याचा निर्णय : संबंधित अधिकाऱ्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना

Advertisement

खानापूर : उन्हाळी सुटीनंतर तालुक्यातील सर्व शाळा शुक्रवार दि. 31 मे रोजी सुरू होणार आहेत. यासाठी शिक्षण खात्याने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नुकतीच सीआरपी, बीआरपी, बीआरटी आणि ईसीओ यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचीची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. यानुसार मे 29 व 30 रोजी शाळा स्वच्छता मोहीम राबविणार असून 31 मे रोजी शाळा प्रारंभोत्सव आयोजित केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत हेणार आहे. उन्हाळी सुटीनंतर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा 31 मे रोजी पुन्हा सुरू होणार आहेत. तालुक्यात मराठी, कन्नड, उर्दू, इंग्रजी या भाषेतील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 400 शाळा आहेत. या सर्व शाळा 31 मे रोजी पुन्हा उन्हाळी सुटीनंतर सुरू होणार आहेत. शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसाठी सर्व नियोजन केले असून वार्षिक आराखडा तयार केला असून त्यानुसार सर्व शाळांना माहिती पुरविण्यात आली आहे.

उद्या शाळांची स्वच्छता, 30 रोजी एसडीएमसीची बैठक

Advertisement

नुकतीच गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी आपल्या क्लस्टरमध्ये मुख्याध्यापकांना माहिती दिली आहे. त्यानुसार 29 रोजी शाळा स्वच्छता मोहीम. 30 रोजी शाळा स्वच्छता आणि एसडीएमसी बैठक घेऊन शाळेच्या प्रारंभोत्सवाची तयारी करण्यात येणार आहे. 31 रोजी शाळा प्रारंभोत्सव करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या दिवसांपासून माध्यान्ह आहाराची सुरुवात करण्यात येणार असून पहिल्या दिवशी गोड जेवण देण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांत जून महिन्याच्या अखेरीपर्यंत शालेय पाठ्यापुस्तके पुरविण्यासाठी आवश्यक क्रम घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत तालुक्यातील सर्व शाळांना 60 टक्के पुस्तके पोहचविल्याची माहिती देण्यात आली.  शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी जवळपासच्या शाळेतील शिक्षकांची बदली आवश्यक शाळेत केली आहे. अतिथी शिक्षकांची माहितीही वरिष्ठांकडे पाठविली आहे. जून अखेरीस अतिथी शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. शालेय गणवेष आणि बूट याचे वितरण पुढील आदेशानंतर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.