महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; चेन्नईत शाळा बंद

05:40 PM Nov 30, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने आज (गुरुवारी) चेन्नईत सर्व बंद पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याची समस्या वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चेन्नई, चेंगलपट्टू, वेल्लोर, पुदुकोट्टई आणि इतर 12 जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांसाठी मध्यम पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे.

Advertisement

त्याचवेळी IMD ने चक्रीवादळाचा इशारा देखील दिला आहे, त्यामुळे अरक्कोनम शहरात NDRF ला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. "नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स टीम आसन्न चक्रीवादळाचा इशारा लक्षात घेऊन अरकोनम शहरात स्टँडबायवर आहे,हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.1 डिसेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर 'मिचांग' चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मिचांग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#Cyclonebangalchennaimichangschool closedstromtarunbharat
Next Article