For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थायलंडमध्ये स्कूलबसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

06:43 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
थायलंडमध्ये स्कूलबसला आग  25 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement

टायर फुटल्याने दुर्घटना झाल्याचा दावा : बसमधून 44 जण करत होते प्रवास

Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

थायलंडमध्ये एका स्कूलबसला आग लागल्याने 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून 44 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बसमध्ये अडकून पडलेल्या अन्य विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न बचावपथकाने चालविला होता. तर बसला आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे सांगणे आहे. बँकॉकच्या खू खोट भागात मंगळवारी दुपारी सुमारे साडे बारा वाजता ही दुर्घटना घडली आहे. ही बस एका शालेय सहलीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.

या बसमध्ये 3-15 या वयोगटातील विद्यार्थी होते. याचबरोबर 5 शिक्षकही या बसमध्ये त्यांच्यासोबत होते. दुर्घटनेनंतर बसचालक फरार झाला असून त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

थायलंडचे पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांनी दुर्घटनेत जीव गमाविणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी परिवहन मंत्र्यांना घटनास्थळी जात स्थितीचा आढावा घेण्याचा आदेश दिला आहे.

आग लागल्यामुळे बसमधील तापमान अत्यंत अधिक असल्याने त्यात शिरणे अत्यंत अवघड होते. याचमुळे दुर्घटनेनंतर बराच वेळ मृतदेह बसमध्येच हेते. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही अशी माहिती देशाचे गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी दिली आहे.

ही बस कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसद्वारे धावत होती. ही अत्यंत दु:खद घटना आहे. मंत्रालयाला अशाप्रकारच्या प्रवासी वाहनांसाठी सीएनजी सारख्या इंधनाच्या वापरावर बंदी घालत अन्य पर्याय शोधण्याचा निर्देश दिला असल्याचे थायलंडच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. रस्ते सुरक्षा प्रकरणी थायलंड हा सर्वात खराब देशांपैकी एक आहे. तेथे खराब वाहने आणि चुकीच्या पद्धतीच्या ड्रायव्हिंगमुळे दरवर्षी 20 हजार दुर्घटना होत असतात.

Advertisement
Tags :

.