आधी खुर्चीवर लाथ मग सिंघम मधील डायलॉग रिलसाठी केला शाळेचा वापर
माजी विद्यार्थ्यांचा प्रताप
मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर
करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव मधील माजी विद्यार्थ्यांचा प्रताप जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात एक प्रताप गाजवला आहे. सोशल मिडीयावर सिंघम मधील डायलॉगवर रिल बनवण्यासाठी या माजी विद्यार्थ्यांने शाळेतील खुर्चीवर लाथ मारली. या रिलसाठी त्याने इतर शालेय साहित्याचाही वापर केला आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना दुसरीकडे शाळेचा वापर रील साठी झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर फोटो काढण्यासाठी आपणच परवानगी दिल्याचे मुख्याध्यापकांची धक्कादायक कबुली दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच सगळीकडेच एकच चर्चा सुरु झाली आहे.
सामाजिक, प्रबोधनात्मक हेतू असलेल्या सिनेमा किंवा लघुपटांचे शुटींग होणार असेल, तर त्यासाठी रितसर अर्ज घेऊन त्यांना शाळा व शाळेच्या आवारात शुटींगची परवानगी दिली जाते. तरी या रिल संदर्भात मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबद्दल मुख्याध्यापकांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर योग्यती कारवाई होईल, अशी माहीती जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.