For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालेय तालुका स्केटिंग स्पर्धा उत्साहात

09:57 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
शालेय तालुका स्केटिंग स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : हॉली क्रॉस इंग्लिश स्कूल बिडी खानापूरतर्फे आयोजित शालेय तालुका प्राथमिक व माध्यमिक स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन बिडी येथील हॉली क्रॉस स्कूलच्या मुख्याधापिका सिस्टर ज्योती फर्नांडिस यांच्या हस्ते झाले. यावेळी शारीरिक शिक्षक नियाजअहमद बागवान, भुजंग नंदुरकर, सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगने, ऋषीकेश पसारे, व अन्य शिक्षकवर्ग उपस्थित होते.  या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 60 स्केटर्सनी सहभाग घेतला होता. विजेते स्पर्धक खालील प्रमाणे

Advertisement

14 वर्षांच्या आतील मुले -अथर्व चिकमठ 2 सुवर्ण, संस्कार पाटील 2 रौप्य, श्री गुरव 2 कांस्य, सर्वेश मारीहाळ 3 सुवर्ण, चंद्रकांत कामोजी 3 रौप्य, विमर्ष टोंनी 3 कास्य, प्रणित एम. 1 सुवर्ण, प्रज्वल मदाकर 1 रौप्य, शिवकुमार मरभोटा 1 कास्य पदक मिळविले. 17 वर्षा खालील मुलांच्या गटात श्रेयश पाटील 2 सुवर्ण, सोहम गावडे  2 रौप्य, यश कुरडूकर 3 सुवर्ण, याझा तांबोडी 3 रौप्य, 17 वर्षा आतील मुली विद्या गुरव 2 सुवर्ण पदक पटकाविले. वरील सर्व विद्यार्थीची जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल पालक व विद्यार्थीनी आयोजकांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.