शालेय विद्यार्थ्याने स्वत: तयार केला स्मार्टफोन
जुना मोबाइल अन् 3डी प्रिंटरची घेतली मदत, विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहून कंपन्या अवाक्
मुलांमध्ये किती प्रतिभा असू शकते याचा विचार आपण अनेकदा करू शकत नाही. शेजारी देश चीनमधून एका अशाच प्रतिभाशाली मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शालेय विद्यार्थ्याने बाहेरच्या दिशेने वळणारी स्क्रीन असलेला मोबाइल तयार केला आहे. हे काम आजपर्यंत मोबाइल कंपन्यांनाही शक्य झालेले नाही.
शाळेत शिकणाऱ्या मुलाने स्वत:च्या प्रतिभेने जगाला दंग केले आहे. त्याने तयार केलेला मोबाइल सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो खरोखरच कमालीचा आहे. मुलाने सादर केलेल्या मोबाइलची क्लिप पाहून दिग्गज कंपन्यांनी त्याच्या उत्पादनात उत्सुकता दाखविली आहे. तसेच या मुलाला भविष्यातील प्रभावी इंजिनियर संबोधिले आहे.
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्याथ्यांने स्वत:च मोबाइल फोन तयार केला. सोशल मीडियावर त्याने हा मोबाइल दाखविल्यावर मोबाइल तयार करणाऱ्या कंपन्याही चकित झाल्या. चीनच्या हुबेई प्रांतात राहणाऱ्या ला बोवेन नाच्या मुलाने ही कमाल केली आहे. ला बोवेन हा यिलिंग हायस्कुलमध्ये शिकत असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो स्वत: तयार केलेला स्मार्टफोन नदाखवत आहे. हा स्मार्टफोन वर्टिकली फोल्ड देखील होतो. त्याच्या या व्हिडिओला 47 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या असून 4 लाखाहून अधिक जणांनी याला लाइक केले आहे.
बाजारात आतापर्यंत केवळ आतील दिशेने फोल्ड होणारे स्मार्टफोन मी पाहिले होते. अशास्थितीत मी बाहेरच्या दिशेने फोल्ड होणारा स्मार्टफोन तयार केला आहे. याची स्क्रीन बाहेर दिसत राहते, भलेही ती वळलेली असेल. हा स्मार्टफोन शाळेच्या मीलकार्डपेक्षा काहीसा जाड असून याची फ्रेम थ्री डी प्रिंटरद्वारे मिळविण्यात आली आहे. याचे बहुतांश पार्ट्स जुन्या फोनमधून काढत वापरण्यात आले आहेत. तर काही पार्ट्स ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे बोवेनचे सांगणे आहे.