तुर्कियेत शाळेत गोळीबार, 11 विद्यार्थी जखमी
06:10 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
अंकारा : तुर्कियेच्या मनिसा प्रांतात एका विद्यार्थ्याने स्वत:च्या शाळेत गोळीबार केला आहे. या गोळीबारात कमीतकमी 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. हल्लेखोराने स्वत:च्या पालकांकडील बंदूक हल्ल्यासाठी वापरली होती. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे तुर्कियेचे न्यायमंत्री अकिन गुरलेक यांनी सांगितले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement