महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाळकरी मुलींवर अत्याचार ! सफाई कामगाराला अटक; बदलापूर रेल्वे स्टेशनवर नागरिकांचा ठिय्या

04:33 PM Aug 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
Badlapur Incident
Advertisement

बदलापूर येथील एका प्रसिद्ध शाळेच्या स्वच्छतागृहात चार वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर शाळेच्या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली असून त्यामुळे बदलापूरमध्ये नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा निषेध करत नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरू केले असून हजारो नागरिकांनी शासनाकडे नराधमांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.

Advertisement

अधिक माहीतीनुसार, तक्रार दाखल केल्याप्रमाणे, शाळेमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या आरोपीने शाळेत शिकणाऱ्या मुलींवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केला. ही घटना मुलींना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार करून पोलिसांकडे धाव घेतली. शाळकरी मुलींची वैद्यकिय तपासणी झाल्यावर आरोपीवर लैंगिक अपराधांपासून मुलींचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दोन तासांच्या आत पोलीसांनी अटक केली असून शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, एक वर्ग शिक्षक आणि एक महिला परिचर यांना तातडीने निलंबित केले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकरणावर माफीनामा झाहीर केला आहे.

Advertisement

बदलापूर रेल्वे स्टेशनवर पालकांचे आंदोलन...
या घटनेची बातमी परिसरात पसरताच बदलापूर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी विषेशता पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं आहे. पालकांनी रेल्वेस्टेशन ताब्यात घेतलं असून त्यामुळे या स्टेशनवरून जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतून विस्कळीत झाली आहे.

बदलापूर रेल्वे ट्रॅकवर नागरीक बॅनर आणि फलक घेऊन उतरले असून यामध्ये महिलांची संख्या लक्षणिय आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना आणि इतर यंत्रणांची दमछाक होत आहे.

 

Advertisement
Tags :
#Badlapur Railway StationBadalapur IncidentMaharashtra newsschool girlsSweeper arrested
Next Article