For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Child Sexual Assult इचलकरंजीत अश्लील व्हिडिओची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ७ जणांना अटक

11:15 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
child sexual assult इचलकरंजीत अश्लील व्हिडिओची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार  ७ जणांना अटक
Advertisement

इचलकरंजी - प्रतिनिधी
येथे अश्लील व्हिडीओ काढल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामुहिक अत्याचार करून शारीरिक, मानसिक छळ तसेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अमन आदम शेख (वय 20), अल्ताफ बशीर नायकवडे (वय 21), अनिकेत संजय भोरे (वय 23, तिघे रा. इचलकरंजी) यांना अटक केली आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल होऊनही प्रसार माध्यमांपर्यंत माहिती का पोहचू दिली नाही याची चर्चा सुरू आहे.

Advertisement

याप्रकरणी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तीन महिन्यापूर्वी मोबाईलवर काही तरी दाखवायचे आहे असे सांगून संशयितांनी संबंधित अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले. एका संशयिताच्या घरात अन्य तिघे संशयित उपस्थित होते. त्यापैकी एका अल्पवयीन संशयिताने तुझा अश्लील व्हिडीओ असल्याची भीती दाखवली. तर दुसऱ्या संशयिताने भिती दाखवत अत्याचार केला. तर तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यावेळी विरोध करत पीडितेने कशीबशी सुटका करुन घेतली.

अश्लील व्हिडिओची धमकी 

Advertisement

संशयित आरोपींनी या अश्लील व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकावत एका ठिकाणी बोलावून घेतले. तेथे आणखीन तीन संशयितांनी तिच्याशी झटापट करत तिचा विनयभंग केला. त्यावेळी पीडितेने सुटका करत धाव घेण्याचा प्रयत्न केला असता एका संशपिताने तिचा पाठलाग करत विनयभंग केला. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रासही देण्यात आला. पीडीत मुलगी शाळेला जात असताना एक संशयीत तिचा सातत्याने पाठलाग करीत होता. तर काही संशयित तिची छेडछाड करीत होते.

संशयितांना अटक

अत्याचाराच्या व्हिडीओवरुन आणि संशयितांच्या नावावरुन तिला टोमणे मारून त्रास देत होते.
या प्रकारामुळे पीडीत मुलगी व तिचे कुटुंबिय भयभीत झाले होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिली. पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी चौघेजण अल्पवयीन आहेत. तर शेख, नायकवडे व भोरे या तिघा संशयिताना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement
Tags :

.