महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिबट्याच्या हल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

01:49 PM Nov 21, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

वर्षातील दुसरी घटना : ठोस उपाय योजनांची स्थानिकांकडून मागणी : घटनास्थळावरील नातेवाईंकांचा आक्रोश हृदयद्रावक

Advertisement

वारणावती प्रतिनिधी

Advertisement

शिराळा तालुका पश्चिम भागातील व शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील चांदोली अभयारण्यालगत शित्तूर- वारूणपैकी तळीचा वाडा या धनगरवाडा वस्तीत राहणारी कु. सारिका बबन गावडे (आठ) ही चौथीमध्ये शिकणारी मुलगी व तिची आई गंगाबाई बबन गावडे या दोघी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास शेत-शिवारात जनावरे घेऊन गेली होती. जनावरे चरायला सोडून ती व तिची आई उभारली असता अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला. तिची आई तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याआधीच सारिकाचा झटापटीत मृत्यू झाला. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. सारिकाचा दुर्दैवी मृत्यू व घटनास्थळावर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. स्थानिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिलेली आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असणारे शित्तूर- वारूणच्या गावालगत चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विस्तीर्ण जंगल आहे. सदर जंगलात पर्यटनासाठी सोडण्यात आलेल्या हिंस्त्र प्राण्यांचा येथील वाडी-वस्तीवरील लोकांना होणारा त्रास हा दैनंदिन झाला आहे. येथील शेतकऱ्यांचे पाळीव प्राण्यांवर नेहमी बिबट्या झडप घालून डोळ्यादेखत भक्ष्य करत असतो. याची तक्रार वारंवार संबंधित वनविभागाला स्थानिकांनी करूनही तुटपुंज्या मदतीशिवाय लोकांच्या पदरात काहीच पडत नाही.

यावर्षी उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे धनगर समाजातील मनीषा डोईफोडे नावाच्या 10 वर्षीय शाळकरी मुलीला बिबट्याने झडप घालून ठार केले होते. तर आज तळीचा वाडा येथील आठ वर्षीय शाळकरी मुलगी सा†रका गावडे या मुलीला झडप घालून जागीच ठार केले.

दिवसा ढवळ्या वन्य प्राण्याचे होणारे हल्ले आणि त्यात मृत्यूमुखी पडणारी माणसे म्हणजे पर्यटन आहे का? असा सवाल येथील स्थानिकांमधून विचारला जात आहे. तरीही संबंधित वनविभाग याबाबत आश्वासनाशिवाय कोणतीही ठोस उपाय-योजना करताना दिसत नाही. एवढी उदासीनता का? माणसे मारून होणारे पर्यटन आमच्या काय कामाचे. सरकारला येथील जनतेचा एकच सवाल की, पर्यटन तुमचं आा†ण मरण आमचं का? जंगली प्राण्यांचे मानवावर वारंवार होणारे हले हा चिंतेचा विषय बनला आहे. जंगली प्राण्यांचे मानवावरील हले होण्यामागची कारणे शोधून उपाययोजना करण्याची मागणी संतप्त स्थानिकांमधून होत आहे.

Advertisement
Tags :
#die#schoolgirlATTACKdeathleopard
Next Article