महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

03:12 PM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगावात गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहे.तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. बसचं स्टेअरींग लॉक झाल्यानं अपघात झाला जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मावनूर,गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती.

Advertisement

बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला. सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही दुर्घटना घडली. म अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. जेव्हा ही बस उलटली तेव्हा बसमध्ये किती विद्यार्थी होते अद्याप याची माहिती समोर आलेली नाही.   घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांचा उपचार सुरु आहे. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement
Tags :
#schoolbusaccident#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article