महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

12:36 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवी तलावातील घटना

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवी तलावातील पाण्यात बुडून 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात करण्यात आली आहे. गिरीश बसवराज तळवार (वय 14) रा. गर्बेनहट्टी (ता. खानापूर) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. गिरीश हा आपल्या काही मित्रांबरोबर सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हन्नव्वा देवी मंदिर पायथ्याशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. पावसामुळे तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

गिरीश पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी तेथून जाणाऱ्या लोकांना दिली. या घटनेची माहिती गिरीशच्या कुटुंबीयांसह परिसरात पसरली. त्यामुळे नंदगड परिसरातील अनेक लोक तलावाच्या बांधावर जमले होते. त्यानंतर गिरीशचा मृतदेह तलावात शोधण्यात आला. अथक प्रयत्नानंतर सायंकाळी साडेपाच वाजता गिरीशचा मृतदेह सापडला. गिरीश हा नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. ते मूळचे होसगट्टी ता. बैलहोंगल येथील असून गेल्या काही वर्षांपासून गर्बेनहट्टी येथे वास्तव्यास होते.  मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article