For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक बांधिलकीतून मलाबारतर्फे विद्यार्थिनींना शिष्यवेतन

10:29 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सामाजिक बांधिलकीतून मलाबारतर्फे विद्यार्थिनींना शिष्यवेतन
Advertisement

बेळगाव : मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने सहा कॉलेजच्या 89 विद्यार्थिनींना शिष्यवेतन दिले आहे. बैलहोंगल, के. के. कोप्प, बिडी, खानापूर, सरदार्स कॉलेज, चिंतामण पीयू कॉलेज येथील एकूण 89 विद्यार्थिनींना 8 लाख 90 हजार रुपयांचे शिष्यवेतन देण्यात आले. भाग्यनगर, सिटी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, नगरसेवक अभिजित, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव ए. जे. व मलाबार गोल्डचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मलाबारतर्फे शिष्यवेतन देण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला. तसेच मलाबारला मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी 5 टक्के नफा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे जाहीर करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.