भारताच्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जपानमध्ये सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सलामीचा सामना 28 सप्टेंबर रोजी तर भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना 18 सप्टेंबर रोजी होईल. भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या या स्पर्धेतील मोहिमेला उपांत्यपूर्व टप्प्यापासून प्रारंभ होईल. भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर तर महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करीत आहे. चीनमध्ये यापूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदके मिळविली होती. महिलांच्या विभागातील अंतिम सामना 22 सप्टेंबरला तर पुरुषांच्या विभागातील अंतिम सामना 3 ऑक्टोबरला खेळविला जाईल. पुरुषांच्या विभागात भारत, बांगलादेश, पाक आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.तर महिलांच्या विभागात भारतासह अन्य 8 संघ सहभागी होत आहेत.