ऑस्करसाठी स्कार्लेटला महत्त्वाची जबाबदारी
5 कलाकारांसोबत करणार सूत्रसंचालन
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स म्हणजेच ऑस्कर जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. केवळ हॉलिवूडच नव्हे तर जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यावेळी एका भारतीय चित्रपटालाही नामांकन मिळाले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा पार पडणार आहे.
यापूर्वी द अकॅडमीने ऑस्कर प्रेझेंटर्सची यादी जारी केली आहे. अनेक हॉलिवूड कलाकार आता सूत्रसंचालक म्हणून दिसून येणार आहेत. यात हॅली बेरी, पेनेलोम क्रूज, एली फॅनिंग, व्हूपी गोल्डबर्ग, स्कार्लेट जोहान्सन, जॉन लिथगो, एमी पोहलर, जून स्क्विब, बोवन यांग यांचा समावेश आहे. यात स्कार्लेट जोहान्सन मुख्य सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडणार आहे. स्कार्लेट ही हॉलिवूडची सद्यकाळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.
ऑस्कर 2025 च्या शर्यतीत अनुजा हा भारतीय चित्रपट सामील आहे. अनुजाला पुरस्काराच्या शर्यतीत ए लीन, आय अॅम नॉट ए रोबोट, मॅन हू कुल्ड नॉट रिमेन सायलेंटशी स्पर्धा करावी लागणार आहे.