महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा

06:39 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मास्टरमाइंड भूपेंद्र सिंह झाला अटकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

Advertisement

गुजरातमधील गांधीनगर येथील सीआयडी क्राईमने 6 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित भूपेंद्र सिंग झाला याला अटक केली आहे. हा घोटाळा बीझेड ग्रुपने केल्याचा आरोप आहे. झाला हा गेल्या एक महिन्यापासून फरार होता, असे गांधीनगरमधील सीआयडी क्राईमच्या आयजी परिक्षिता राठोड यांनी सांगितले. सूत्रधार झाला याच्याविरोधात पाच एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सीआयडी क्राईमच्या पथकाने त्याच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर तो फरार झाला होता. झाला याने गुजरातच्या विविध शहरांमध्ये बीझेड फायनान्शियल सर्व्हिसेस, बीझेड इंटरनॅशनल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड, बीझेड प्रॉफिट प्लस, बीझेड मल्टी ट्रेड, बीझेड ग्रुप ऑफ मॅनेजमेंट, बीझेड ग्रुप ऑफ डेव्हलपर्स, बीझेड कॅपिटल सोल्युशन्स आणि बीझेड हेवी इलेक्ट्रॉनिक्स यासह अनेक कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देत विनामूल्य टीव्ही, मोबाइल फोन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टूर तसेच मुदत ठेवींवर 7 टक्के जास्त व्याज यांसारख्ााr आमिषे दाखवत गुंतवणुकदारांना प्रोत्साहित केले होते.

कंपनीने गुंतवणुकदारांना सामान्य बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजाची ऑफर देऊन आमिष दाखवल्याचे सीआयडीने म्हटले आहे. पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना 32 इंची टीव्ही किंवा मोबाईल फोन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 10 लाख रुपयांसाठी कंपनीने गोर्वा टूर ऑफर दिली आणि 7 टक्के व्याजाच्या लेखी वचनबद्धतेसह 18 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article