महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिठागरांची जमिनी बिल्डरांना देण्याचा महाघोटाळा ! काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप

03:58 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Varsha Gaikwad
Advertisement

मिठागरांची जमिन धारावीच्या पुनर्वसनासाठी देत मुंबईतील मोठ्या जमिनी लाडक्या बिल्डरांच्या स्वाधीन करण्याचा महाघोटाळा महायुतीचे सरकार करत असल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस खा. वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 हजार 3 शे 78 एकूण अशी 30 ते 35 टक्के जागा मिठागरांची असून या जमीन कमी किमतीत हडपण्याचे काम सुऊ आहे. हा भ्रष्टाचार असून हा महाघोटाळा समोर आणण्याचे काम सुऊ आहे. यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत देखील उपस्थित होते. ही पत्रकार परिषद कांजुरमार्ग येथील मिठागरांच्या जागेवर मुद्दाम घेण्यात आली असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

Advertisement

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील मोक्याच्या जागा अदानींना देण्यात येत असून यापूर्वी सुद्धा त्या देण्यात आल्या आहेत. येथील 256 एकर मिठागराची जागा अदानीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही निविदा अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आली. धारावी 550 एकरवर असल्याचे सांगत त्या नावाखाली दीड हजार एकर जमिन अदानीला देण्यात आले. ही जागा मिठागराची जागा आहे. हजारो कोटी किमतीच्या जागा मोफत देण्यात येत असून धारावी विकासाच्या नावाखाली स्वस्तात जमिनी देण्याचा महाघोटाळा सुऊ आहे. मुलुंडचा जकात नाका, मिठागारे, डंपिग ग्राऊंड तसेच मदर डेअरीच्या जागा देण्याचे डाव सुऊ असल्याचे गायकवाड म्हणाल्या. अशा जागा 99 वर्षाच्या लीजवर देण्यात येतात. मात्र ही जागा ज्या खासगी कंपनीला देण्यात आली आहे त्या कंपनीचे 80 टक्के शेअर अदानींचे असून 20 टक्के शेअर सरकारचे आहेत. त्यातून या मोठ्या जागा अदानीला देण्याचे काम सरकार करत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मिठागरांची मोकळी जागा हवी :
गायकवाड म्हणाल्या की, मोकळी मिठागरे पावसाचे पाणी शोषण करण्याचे काम करत असून मुंबईतील पूर स्थिती नियंत्रणात ठेवते. मिठागारांची मोकळ्या जागा पावसाचे 12 दश लाख लिटर पाणी शोषणाचे काम करण्याचे काम करते. त्यामुळे पर्यावरणावाद्यापासून ते तज्ञांपर्यंत सर्व जणांचा या जमिनी देण्यास विरोध आहे. धारावी हा प्रकल्प असून धारावीतील सर्व पात्र असलयाचे सांगण्यात येत आहे. शिवाय धारावीतील सर्वांना तिथेच घरे देण्याचे ठरले असताना आज विविध ठिकाणच्या जागां देण्याचे काम सुऊ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला त्यामुळे हा भ्रष्टाचार आहे. याला पाठीशी घालण्याचे काम सुऊ आहे. फडणवीस यांनी एका ट्विटमध्ये मिठागरे ही आरक्षित जंगल असल्याचे म्हटले असताना आता ती जागा कशी मागू शकतात असा प्रश्न विचारला. याच कारणासाठी जर मेट्रोच्या कारशेडसाठी मिठागराची जागा दिली नाही तर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कशी देणार असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक उपक्रमाला जागा देण्यास विरोध करायचा आणि खासगी कंपनीला जागा द्यायची असा हा अदानी कोण असल्याचा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. तसेच मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने भुमिका बदलली असून या जमिनीवर एका गृहप्रकल्पाचे काम देण्याचे उद्योग सुऊ केला. तसेच केंद्र सरकारने घुमजाव करून ही जमिनी मेट्रो सहाला देण्याचे घाट घातला आहे. मात्र या घुमजाव भुमिकेवर केंद्र सरकार आता गप्प आहेत. महावि सरकार असताना अशा प्रकल्पांसाठी अडथळे आणले गेल्याचे सचिन सावंत म्हणाले. आरे कॉलनीतील आणि या मिठागरांच्या जमिनीबाबत फडणवीस खोटे बोलत असल्याचा दावा देखील सावंत यांनी केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#Varsha GaikwadcongressMithagarMumbai president Varsha Gaikwad
Next Article