एसबीआय फंडस् मॅनेजमेंट समभाग 7 टक्के तेजीसह सुचीबद्ध
वृत्तसंस्था, मुंबई
एसबीआय फंडस् मॅनेजमेंट यांच्या आयपीओला अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सदरचा समभाग बाजारात मंगळवारी प्रीमियमसह सुचीबद्ध झाला असून पहल्याच दिवशी चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिला.
समभाग 6.85 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध झाला. मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात समभाग 8 टक्केपेक्षा अधिक वधारला होता. कंपनीचा समभाग एनएसईवर 613 रुपये तर बीएसईवर 610 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. सुचीबद्ध होताच गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीवर भर दिला. लिस्टिंगनंतर समभागाने 624 रुपये एनएसईवर तर 622 रुपयेपर्यंत बीएसईवर मजल मारली होती. समभागाची इशु किमत 574 रुपये इतकी होती. 6.8 टक्के वाढीसह एनएसईवर 613 रुपयांच्या भावावर समभाग पोहचला. प्रतिसमभाग 39 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली.
एका लॉटमध्ये 26 समभागांचा समावेश होता. जर एखाद्याने हा लॉट घेतला असेल आणि त्याने 613 रुपयांना विकल्यास त्याला प्रति समभाग 39 रुपयांचा परतावा मिळाला असता. एका लॉटमध्ये गुंतवणूकदाराला 1022 रुपयांचा नफा झाला असता. 620 रुपयांवर समभाग विकला असलेल्याला 46 रुपये प्रति समभाग लाभ झाला असता जो लॉटमध्ये पाहता 1216 रुपयांचा नोंदला गेला असता.