एसबीआय फंडचा येणार आयपीओ
13 हजार कोटी उभारणार
वृत्तसंस्था/मुंबई
देशाची सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी एसबीआय फंड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड लवकरच आपला आयपीओ सादरीकरण करणार आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी 13000 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. भारतातल्या वित्त क्षेत्रामधील सर्वात मोठी आयपीओ सादरीकरण करणारी ही कंपनी होऊ शकते. या महिन्याअखेर कंपनी आपली अर्जासंबंधित कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज करु शकते. जर का सर्व योग्य पद्धतीने झाल्यास गुंतवणूकदारांना लवकरच म्युच्युअल फंड उद्योगामध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकणार आहे.
वित्त क्षेत्रातील मोठी कंपनी
सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी म्हणून एसबीआय फंड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा उल्लेख केला जातो. चालू आर्थिक वर्षाच्या अखेर कंपनी आपला अर्ज सादर करणार असून तसे न झाल्यास पुढच्या आर्थिक वर्षामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
फेब्रुवारीत प्रक्रिया रखडली
याआधी फेब्रुवारी अखेरपर्यंत अर्ज सादर करण्याचे कंपनीने ठरवले होते परंतु तो काही सादर होऊ शकला नाही. दीर्घकालीन ऑडिट प्रक्रियेमुळे फेब्रुवारीमध्ये कंपनीला फेब्रुवारीमध्ये अर्ज सादर करता आला नाही.