एसबीआय आणि युनियन बँक वाढवले ठेवींवरचे व्याजदर
मुंबई :
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांनी 27 डिसेंबरपासून आपल्या ठेवीवरचे व्याजदर वाढवले असल्याची माहिती मिळते आहे. जवळपास ही वाढ 0.50 टक्के इतकी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एसबीआय आणि युनियन बँक यांनी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवीवर व्याजदरात 0.50 टक्के इतकी वाढ केली आहे. ठराविक कालावधीकरीता जादाच्या व्याजदराचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. एसबीआय बँक 7 ते 45 दिवसांकरीता 0.50 टक्के वाढीसह 3.50 टक्के व्याजदर आकारणार आहे. यानंतरच्या कालावधीकरीता 179 दिवसांपर्यंत 0.25 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. युनियन बँकेने आपल्या ठेवीवरचे व्याजदर 0.25 टक्के वाढवले आहेत. 7 ते 15 दिवसांसाठी बँक 3 टक्के व्याजदर आकारणार आहे तर 121 ते 180 दिवसांसाठी 4.4 टक्के व 1 वर्षासाठी 6.30 टक्के इतका व्याजदर आकारला जाणार आहे. याशिवाय वरिष्ठ नागरिकांना ठेवींवर 0.50 टक्के इतके अधिक व्याज मिळणार आहे.