SBI कडून व्याजदरात कपात
10:21 AM Jun 09, 2020 IST
|
Abhijeet Khandekar
Advertisement
ऑनलाईन टीम / मुंबई :
Advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (MLCR) 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (दि.10) हे नवे दर लागू होतील. स्टेट बँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Advertisement
मागील महिन्यात देखील स्टेट बँकेने एमसीएलआर दरात 0.15 टक्क्यांची कपात केली होती. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7 टक्के झाला आहे. SBI ने आतापर्यंत सलग 13 वेळा एमसीएलआर दरात कपात केली आहे. उद्यापासून होणाऱ्या व्याजदर कपातीमुळे गृह कर्ज, वाहन कर्ज कमी दरात उपलब्ध होईल. तसेच MLCR शी संबंधित कर्जाचे हप्ते, ईबीआर कमी होईल.
यापूर्वी बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि पंजाब नॅशनल बँकयांनी रेपोसंलग्न कर्जदर आणि एमसीएलआर दर कमी केले आहेत. त्यानंतर स्टेट बँकेनेही आधारदर 8.15 टक्क्यांवरून 7.40 टक्के केला आहे.
Advertisement
Next Article