For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

SBI कडून व्याजदरात कपात

12:00 PM Jul 08, 2020 IST | Abhijeet Khandekar
sbi कडून व्याजदरात कपात
Advertisement

ऑनलाईन टीम / मुंबई : 

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (MLCR) 0.05 ते 0.10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जुलैपासून हे नवे दर लागू होतील. स्टेट बँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मागील महिन्यात देखील स्टेट बँकेने MLCR कर्ज दरात 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्यापूर्वी 0.15 टक्के अशी आतापर्यंत SBI ने 14 वेळा MLCR च्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे 10 जुलैपासून गृह कर्ज, वाहन कर्ज कमी दरात उपलब्ध होईल. तसेच MLCR शी संबंधित कर्जाचे हप्ते, ईबीआर कमी होईल. स्टेट बँकेचे सध्याचे MLCR चे व्याज दर सर्वात कमी असल्याचा दावाही बँकेने केला आहे.

Advertisement

या कपातीनंतर स्टेट बँकेचा वार्षिक EBR 7.05 टक्क्यांवरून 6.65 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी  बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांनीही रेपोसंलग्न कर्जदर आणि एमसीएलआर दर कमी केले आहेत.

Advertisement
Tags :

.