‘जनक’ चित्रपटात सायली संजीव
स्वाभिमान, सत्य आणि न्यायाची लढाई!, कोर्टरुम ड्रामाचा अनोखा मेळ साधणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शक अभिषेक कंवर यांच्या या चित्रपटाच्या पोस्टरमधून रहस्य, संघर्ष आणि न्यायाच्या लढाईची झलक पहायला मिळते.
या चित्रपटात अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, आंsकार भस्मे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार यात दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भस्मे यांचे आहे.
एक स्त्राr... एक सत्य... आणि एक लढा या तीन सूत्रांभोवती गुंफलेली ही कथा नेमकं सत्य काय आहे आणि न्यायाच्या या लढाईत कोण जिंकणार? याची उत्सुकता निर्माण करते. अभिषेक कंवर दिग्दर्शिक आणि आर.टी.बी फिल्म्सकडून प्रस्तुत ‘जनक’ हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
