खंडाळ्यातील सायली बारला ठोकले टाळे
रत्नागिरी :
तालुक्यातील वाटद खंडाळा येथील खून प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सायली बारला राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाकडून ठाळे ठोकण्यात आले.
या बारमध्ये खूनाच्या घटना घडल्याने बारला सील करण्यासंबंधी पोलिसांकडून अहवाल उत्पादन शुल्क विभागाला पाठवण्यात आला होत़ा यासंबंधी तातडीने कारवाई करत उत्पादन शुल्क विभागाने गुऊवारी सायली बार सील केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक ब़ी बी महामुनी यांनी दिली.
भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर यांना अटक केली आह़े यावेळी पोलिसांनी दुर्वास पाटीलचा आयफोन तसेच सुशांत नरळकर व विश्वास पवार यांचे मोबाईल जप्त केले आहेत़ घटनेच्या दिवशी तिनही आरोपींनी एकमेकांना केलेले कॉल पोलिसांना आढळून आले आहेत़ दुर्वासच्या मोबाईलमधून पोलिसांना काही धक्कादायक माहितीही मिळाली आह़े त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवली जात आहेत़
- भक्तीच्या खूनानंतर दुर्वास बेधुंद नाचला
शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील हा बारमध्ये बेभान होऊन नाचला होत़ा दुर्वास याचे अन्य एका मुलीशी लग्न ठरले होत़े मात्र यामध्ये प्रेयसी भक्ती ही लग्न करण्यासाठी तगादा लावत असल्याने दुर्वास याने तिचा खून करण्याचा कट रचल़ा 16 ऑगस्ट रोजी सायली बारमध्ये भक्तीचा गळा आवळून खून केल्यानंतर दुर्वास बेभान होऊन नाचू लागला. तीन खून करणाऱ्या दुर्वास याचा पूर चेहरा तपासामध्ये उघड झाला असून पोलीस देखील त्याच्या कारनाम्यांनी चक्रावले आहेत़
दुर्वास दर्शन पाटील (28, ऱा वाटद खंडाळा) याने केलेल्या तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आह़े दुर्वास याचे मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होत़े मात्र आपल्याला डावलून दुर्वास अन्य मुलीशी लग्नाची गाठ बांधत असल्याचे समजताच भक्तीला धक्का बसल़ा याबाबतचा जाब तिने दुर्वास याला विचारण्यास सुऊवात केल़ी तसेच आपल्याशीच लग्न करण्याचा तगादा तिने दुर्वास याच्याकडे लावल़ा
इकडे आपल्या ठरलेल्या लग्नात भक्ती काहीतरी गोंधळ निर्माण करणार, या भीतीने दुर्वास याच्या मनात काहूर माजले होत़े काहीतरी कऊन भक्ती हिचा काटा काढला पाहिजे, असा विचार त्याच्या मनात घोंघावत होत़ा या गोष्टीची कल्पना त्याने आपला खास मित्र विश्वास पवारला दिल़ी भक्तीचा खून करण्यापूर्वी दुर्वासने कळझोंडीतील सीताराम वीर व वाटद खंडाळा येथील राकेश जंगम याचा खून केला होत़ा या खूनामध्ये त्याच्यासोबत विश्वास पवार सोबत होत़ा मात्र हे दोन्ही खून उघडकीस आले नव्हत़े भक्ती हिचा खून करण्याचा इरादा करून 16 ऑगस्ट 2025 रोजी दुर्वासने तिला आपल्या खंडाळा येथील सायली बार येथे बोलावून घेतल़े यानंतर बारमधील एका खोलीमध्ये दुर्वास, विश्वास पवार व सुशांत नरळकर या तिघांनी भक्तीचा गळा आवळून खून केल़ा यानंतर तिघांनी भक्तीचा मृतदेह चारचाकी गाडीमधून आंबा घाट येथे फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
- संशय टाळण्यासाठी चौकशीला वेळेत राहत होता हजर
भक्ती ही बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने रत्नागिरी शहर पोलिसात दाखल केली होत़ी तसेच तिच्या बेपत्ता होण्यामागे दुर्वास याचाच हात असल्याचा संशय तिच्या भावाने पोलिसांजवळ व्यक्त केला होत़ा यावेळी पोलिसांकडून दुर्वासला चौकशीसाठी बोलावले जात होत़े आपल्यावर पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी दुर्वास वेळेवर चौकशीसाठी शहर पोलिसात हजर राहत होत़ा मात्र त्याच्या विसंगत जबाबामुळे संशयाची सुई त्याच्याकडेच वळली आणि खूनाचा छडा लागल़ा