For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीच्या पत्रकारितेला निर्भिडतेचा इतिहास

09:27 PM Apr 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीच्या पत्रकारितेला निर्भिडतेचा इतिहास
Advertisement

मनिष दळवी यांचे प्रतिपादन; पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Advertisement

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात "एआय" प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बदलत्या काळासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सज्ज व्हावे, असे ते म्हणाले.सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आज तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. दळवी बोलत होते. यावेळी भोसले नॉलेज सिटीच्या संस्थापक अध्यक्ष ॲड. अस्मिता सावंत भोसले, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, वसंत उर्फ अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,अभिमन्यू लोंढे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ, डाॅ. पांडुरंग वजराटकर, , सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, दीपक गावकर, काका भिसे, मोहन जाधव, राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर, जतीन भिसे, निलेश परब, मंगल कामत, मंगल नाईक, अनुजा कुडतरकर, ओंकार तुळसुलकर, सचिन रेडकर, रूपेश पाटील, साबाजी परब, उमेश सावंत, ॲड. अनिल निरवडेकर, रमेश बोंद्रे, अजित दळवी, नीलकंठ कुपेकर, उमा कुपेकर, आशितोष भांगले, नीरज देसाई, अवधूत पोईपकर, विजय राऊत,महादेव परांजपे, निलेश मोरजकर, शैलेश मयेकर, अभय पंडीत,दिव्या वायंगणकर,
लुमा जाधव, खुशी रेडकर, प्रणाली सावंत, तारक पिळणकर आदी उपस्थित होते.यावेळी श्री. दळवी पुढे म्हणाले, जिल्ह्याचा दक्षिण भाग विकसित होत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील लोकांनी एकत्र येत काम करणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा एआय युक्त करणार आहोत. त्यामुळे बदलत्या काळात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात पर्यटन दृष्ट्या प्रकल्प येत आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांना नव्या संधी उपलब्ध होत आहे. त्या संधीचा फायदा झाला पाहिजे यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीतून योग्य ते मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले.दरम्यान वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार सावंतवाडीतील पत्रकार नागेश पाटील, कै. जयानंद मठकर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे डेस्क इन्चार्ज अवधूत पोईपकर, कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार महादेव परांजपे, नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार प्रवीण परब, आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार विश्वनाथ नाईक, ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार अजित दळवी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, अँड.अनिल निरवडेकर,सुनील राऊळ,नीरज देसाई आदींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी बांदेकर यांनी प्रास्ताविक तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि आभारप्रदर्शन मंगल नाईक जोशी यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.