महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

''हे चांदणे फुलांनी'' संगीत मैफिलीत सावंतवाडीकर मंत्रमुग्ध

02:30 PM Nov 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सलग ६ व्या वर्षी आयोजन

Advertisement

सावंतवाडी :

Advertisement

श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, मान. नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सहव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त "हे चांदणे फुलांनी..." जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले. रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रम्य सायंकाळी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री राजन पोकळे, श्री श्रीपाद चोडणकर, श्री नंदू शिरोडकर, श्री आबा केसरकर, श्री दिनकर परब, श्री दादा मडकईकर, श्री भाई देऊलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

सौ. वर्षा देवण - धामापुरकर, ॲड. सिद्धी परब, , कु केतकी सावंत,कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर,सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, सौ मानसी वझे, कु अंकुश आजगांवकर, कु स्मिता गावडे यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले व कु चिन्मयी मेस्त्री, कु श्रिया म्हालटकर, कु तन्वी दळवी, कु आरोशी परब, कु आरोही परब, कु. विभव विचारे, कु. ऋतुजा परब, कु. मुग्धा पंतवालावलकर या बालचमुच्या विशेष सादरीकरणाने सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेतले तर कु. मनिष पवार, कु. मंगेश मेस्त्री व कु पुरुषोत्तम केळुसकर या त्रिकूटाच्या हार्मोनियम वादक वादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व कार्यक्रमास अधिकच रंगत आली.

या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री (हार्मोनियम), श्री किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत, कु निरज मिलिंद भोसले (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री, कु. पुरुषोत्तम केळुसकर (सिंथेसायझर) यांनी केली तर श्री संजय कात्रे यांनी आपल्या विशेष व अभ्यासपूर्ण शैलीमध्ये निवेदनाची धुरा सांभाळली व ध्वनीव्यवस्था श्री हेमंत मेस्त्री - पडेलकर (विघ्नहर्ता साऊंड) यांनी सांभाळली.
या मैफिलीस सौ. हेमलता मिरजकर, श्री मिरजकर ,सौ अनघा रमाणे, श्रीम.रजनी ख्ककर,सौ अर्चना वझे, श्री सुधीर धुमे, श्रीम. मानसी भोसले, शुभांगी खानोलकर, लक्ष्मण आंबेरकर, सुवर्णा मुधाळे, संजय केरकर, बाळासाहेब पाटील, प्रसाद दळवी, सुभाष राऊळ, राजेश गुडेकर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळीनी व जिल्हाभरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटच्या सादरीकरणापर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु. गोविंद माळगावकर, श्री हेमंत खानोलकर, श्री सोमा सावंत,श्री तानाजी सावंत इ. यांचे विशेष सहाय्य लाभले.

Advertisement
Tags :
# sawantwadi # music concert
Next Article