For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडीत वॉशिंग मशीनला आग; घरातील साहित्य जळून खाक, दीड ते दोन लाखांचे नुकसान

01:50 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत वॉशिंग मशीनला आग  घरातील साहित्य जळून खाक  दीड ते दोन लाखांचे नुकसान
Advertisement
सावंतवाडी, प्रतिनिधी : सावंतवाडी जिमखाना मैदानाजवळील सावंत चाळ येथे भगवान सावंत यांच्या घरातील वॉशिंग मशीनला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत वॉशिंग मशीनसह कपडे, घरातील इतर साहित्य आणि स्वयंपाकघराच्या छपराचे मोठे नुकसान झाले. या घटनेत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती भगवान सावंत यांनी दिली. सुदैवाने, घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सावंत चाळीतील शेजाऱ्यांना भगवान सावंत यांच्या घरातील एका खोलीतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने भगवान सावंत आणि त्यांच्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Advertisement

आग विझवण्यासाठी नंदू गावकर, सचिन इंगळे, अजित सांगेलकर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महिलांनी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग विझवण्याच्या कामाला मदत झाली.

भगवान सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वॉशिंग मशीन अवघ्या सहा महिन्यांपूर्वी खरेदी केली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी वीजपुरवठा बंद असल्याने घर बंद करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर नेमके काय घडले, हे स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

घराच्या स्वयंपाकघरात वॉशिंग मशीन ठेवण्यात आली होती. आगीत या खोलीचा छपराचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच वॉशिंग मशीन, कपडे, चपला आणि अन्य घरगुती साहित्याचेही नुकसान झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.