For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; सोनुर्ली परिसरातील घटना

02:13 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू  सोनुर्ली परिसरातील घटना
Advertisement

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील सोनुर्ली-होळीचा खुर्द येथे मुंबई-गोवा रेल्वेमार्गावरून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

मंगेश राजाराम केनी (22, रा. रोणापाल, आरोसकर टेंब, सावंतवाडी) यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रेल्वे मार्गाच्या उजव्या बाजूच्या वहाळीत एक पुरुष मृतावस्थेत आढळून आला. चालत्या रेल्वेतून प्रवास करताना त्याचा टी-शर्ट झाडीत अडकल्याने तो खाली पडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेतून पडल्याने त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, हवालदार सुरेश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल खुराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीजवळ ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र आढळून न आल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

शनिवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे करीत आहेत.

Advertisement
Tags :

.