For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रविवारी प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन

12:20 PM Jul 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
रविवारी प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन
Advertisement

शिक्षक परिवाराचा होणार गुणगौरव व सन्मान

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी - शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलै रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन सभागृहात होणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, राज्य कोषाध्यक्षा सौ विनयश्री पेडणेकर, राज्य संघटक.प्रशांत पारकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, महिला सेल जिल्हाध्यक्षा संजना ठाकुर, जिल्हा सचिव सिमा पंडीत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमात दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड, सावंतवाडी तालुक्यातील दहा गुणवंत विद्यार्थी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा सन्मान, गुणवंत शिक्षकांच्या मुलांचा सन्मान, नवयुक्त शिक्षकांचा सन्मान, सेवानिवृत्त सभासद, यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची सावधर तालुका व महिला सेल कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष महेश पालव, सरचिटणीस अमोल पाटील, कोषाध्यक्षा सौ. नेहा सावंत, महिला सेल अध्यक्षा सौ. वंदना सावंत अध्यक्षा, सचिव सौ. तेजस्विता वेंगुर्लेकर आदींनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.