For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची उद्या सावंतवाडीत बैठक

12:01 PM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची उद्या सावंतवाडीत बैठक
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिला मजल्यावर पत्रकार कक्षाच्या शेजारील सभागृह क्र.७ येथे आयोजित करण्यात आली आहे. महावितरण कंपनी कडून पुरविण्यात येणाऱ्या वीज सेवांमधील समस्यामुळे ग्राहकांमध्ये वारंवार नाराजी असून महावितरण कडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांमधिल त्रुटींवर चर्चा करणे. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये सावंतवाडीत वीज ग्राहक मेळावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला सर्व तालुका कार्यकारिणी, तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तालुका संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.