For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ता खड्ड्यांत की खड्ड्यांत रस्ता? पावसाने सावंतवाडीतील रस्त्यांची पोलखोल; भोसले कॉलेजकडे जाणारा मार्ग उखडला; वाहनधारक त्रस्त

05:46 PM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
रस्ता खड्ड्यांत की खड्ड्यांत रस्ता  पावसाने सावंतवाडीतील रस्त्यांची पोलखोल  भोसले कॉलेजकडे जाणारा मार्ग उखडला  वाहनधारक त्रस्त
Advertisement

सावंतवाडी : शहरातील 4 नंबर शाळेच्या खालील बाजूसून भोसले कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून डांबराचा थर उखडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Advertisement

सुमारे चार महिन्यांपूर्वी या परिसरात गॅस आणि पाण्याच्या पाइपलाइनच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने डागडुजी करण्यात आली नसल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था बिकट झाली. काही ठिकाणी रस्ता अक्षरशः वाहून गेल्याचे चित्र आहे.

या मार्गावरून दररोज विद्यार्थी, स्थानिक नागरिक तसेच मोठ्या संख्येने दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांची ये-जा असते. रस्त्यावरील खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहनांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

शहरातील इतर रस्त्यांचीही दुरवस्था

भोसले कॉलेजकडे जाणाऱ्या या मार्गापुरतीच समस्या मर्यादित नसून सावंतवाडी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नसून वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे.

पालिका आणि संबंधित प्रशासनाने रस्त्यांची पाहणी करून तातडीने डागडुजीची कामे हाती घ्यावीत. विशेषतः शाळा व महाविद्यालयांकडे जाणाऱ्या मार्गांची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.