For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला स्व. मधू दंडवतेंचे नाव देणार

03:46 PM May 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला स्व  मधू  दंडवतेंचे नाव देणार
Advertisement

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण होणार आहे . कोकण रेल्वेचे शिल्पकार , लोकनेते स्वर्गीय मधू दंडवते यांचे नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला दिले जाणार असल्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून या निर्णयाचे समस्त कोकणवासियांमधून स्वागत होत आहे . लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस अशा नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.