For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई; गोवा बनावटीच्या दारूसह 38.80 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेत, एक पसार

04:39 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई  गोवा बनावटीच्या दारूसह 38 80 लाखांचा मुद्देमाल जप्त  दोघे अटकेत  एक पसार
Advertisement

सावंतवाडी : बांदा-आंबोली मार्गावरील सातोळी-बावळाट येथे सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या अवैध दारूसह तब्बल 37 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 22 लाख 80 हजार रुपये किमतीचा दारूसाठा आणि 15 लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पोचा समावेश आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा संशयित पसार झाला आहे.

Advertisement

पोलिसांना बांदा-आंबोली मार्गे आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सातोळी-बावळाट येथे सापळा रचून MH-45 AF-1540 क्रमांकाच्या आयशर टेम्पोची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये पुठ्ठ्याचे 380 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 'रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की' या गोवा बनावटीच्या दारूच्या 750 मिलीच्या 12 प्लास्टिक बाटल्या होत्या. जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत 22 लाख 80 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

या कारवाईत एकनाथ सुखदेव इंगोले (26) आणि भिमराव बंडू शेटे (26) या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा साथीदार प्रवीण दत्ताराम खांडेकर (27) हा महाराष्ट्राची हद्द सुरू झाल्यानंतर वाहनाच्या मागून येत असताना रस्त्यात उतरून पसार झाला.

तिघांनी संगनमत करून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार आरोपीचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.