For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत पाणीपुरवठा पाइपलाइनला बिघाड; काही तासांत दुरुस्ती

04:55 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत पाणीपुरवठा पाइपलाइनला बिघाड  काही तासांत दुरुस्ती
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील तहसीलदार कार्यालय ते मिलाग्रीस स्कूलदरम्यान नळपाणी योजनेच्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत होता. या समस्येची पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना देत दुरुस्तीचे काम हाती घेतले.

Advertisement

अवघ्या काही तासांत पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळू लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. समस्या तातडीने सोडवल्याबद्दल नागरिकांनी प्रतीक बांदेकर यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.