अखेर सावंतवाडी नगरपरिषदेला मुहूर्त मिळाला !
शासकीय गोदामाजवळील धोकादायक झाडे तोडण्याचे काम उद्यापासून हाती घेणार
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शासकीय गोदामा समोरील धोकादायक झाडे तोडण्याला अखेर नगरपरिषदेस मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाड तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या ठिकाणी वितरणच्या वाहिनी असल्यामुळे ती झाडे तोडण्याच्या वेळी काढण्यात येणार आहे. त्याची पाहणी वीज वितरणचे अधिकारी खोब्रागडे यांनी गुरुवारी केली. येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी असलेली झाडे धोकादायक बनली होती. रेन ट्री नावाने ही झाडे ओळखली जातात. या ठिकाणी आठवडा बाजारही भरतो. अलीकडे झाडे उन्मळून पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासकीय गोदामासमोर असलेली धोकादायक झाडे शालेय विद्यार्थी ,नागरिक तसेच आठवडा बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक बनल्याने ती तोडण्यात यावी अशी मागणी होती . त्यानुसार ही झाडे तोडण्यात येणार आहेत .