For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडीत MNGL च्या नावाने सायबर फसवणुकीचे प्रकार; नगराध्यक्षांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

02:30 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत mngl च्या नावाने सायबर फसवणुकीचे प्रकार  नगराध्यक्षांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Advertisement
सावंतवाडी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या नावाचा वापर करून सावंतवाडी शहरातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. बनावट कॉल आणि मेसेजद्वारे गॅस ग्राहकांना लक्ष्य केले जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे सावंत-भोसले यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सायबर भामटे नागरिकांना गॅस बिल भरण्यासाठी किंवा कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली संपर्क साधत आहेत. तसेच बिल भरले नाही तर रात्री 10 वाजता गॅस कनेक्शन तोडण्यात येईल, अशी धमकी देऊन ग्राहकांकडून ओटीपी, कस्टमर आयडी आणि वैयक्तिक माहिती मागितली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काल रात्री सावंतवाडी येथे बिर्जे आणि पोकळे या दोन ग्राहकांच्या तक्रारी अधिकृतपणे नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी काही ग्राहकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सावंतवाडी शहर भाजप मंडल विभागातर्फे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या पथकाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Advertisement

यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, दिपाली भालेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, प्रतीक बांदेकर आणि दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

या प्रकरणाची सायबर सेलमार्फत तातडीने चौकशी करून फसवणुकीच्या प्रकारांमागील व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.