For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी पत्रकार संघ सेमीफायनलमध्ये

03:13 PM Jan 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी पत्रकार संघ सेमीफायनलमध्ये
Advertisement

सिंधुदुर्गनगरी : येथे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ स्पर्धा रंगल्या असून सावंतवाडी विरुद्ध वेंगुर्ला सामन्यात सावंतवाडी पत्रकार संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेंगुर्ला संघाने या सामन्यात दमदार फलंदाजी करीत निर्धारित 4 षटकात तब्बल 46 धावा फटकावल्या व सावंतवाडी संघासमोर विजयासाठी 24 चेंडूत 47 धावांचे खडतर आव्हान ठेवले.

Advertisement

या धावांचा पाठलाग करीत सावंतवाडी संघाकडून राजारान धुरी यांनी तुफानी खेळी, सचिन रेडकर यांनी दमदार फलंदाजी केली. शेवटी अनिकेत गावडे यांच्या दोन चौकार आणि एका उत्तुंग षटकारमुळे सावंतवाडी संघाने एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळविला व दमदार आगेकूच केली आहे. दमदार फटकेबाजीमुळे वाडी संघाने हा विजय मिळविला.या स्पर्धेत जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.