For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीचे माजी नगरसेवक राजाराम उर्फ राजा स्वार यांचे निधन

01:11 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीचे माजी नगरसेवक राजाराम उर्फ राजा स्वार यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी : सावंतवाडीतील प्रसिद्ध खाजा व्यापारी तथा माजी नगरसेवक राजाराम उर्फ राजा मोतीराम स्वार (72) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Advertisement

राजा स्वार यांनी सावंतवाडी नगरपालिकेत तब्बल दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. तसेच काही काळ त्यांनी सभापती पदाची जबाबदारीही सांभाळली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला.

गेली तीन दशके ते ‘स्वार खाजा मार्ट’ हा व्यवसाय चालवत होते. त्यांच्या खाजाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह बेळगाव, गोवा आणि कर्नाटकातील विविध भागांत लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांसाठी मोठी मागणी होती.

Advertisement

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, बहिणी, भावोजी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.