For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुसळधार पावसात सावंतवाडी तुंबली !

03:54 PM Jul 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मुसळधार पावसात सावंतवाडी तुंबली
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्गात सकाळपासून कोसळधार ; येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली . त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे .सावंतवाडी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने बाजारपेठेत पाणीच पाणी साचले होते . कमी कालावधीत जास्त पाऊस कोसळल्याने पाणी पातळीत देखील वाढ झाली . सकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर दुपारपर्यंत तसाच असल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली . वाढलेल्या पाण्यातूनच वाट काढताना नागरिक दिसत होते .भारतीय हवामान विभागाकडून रत्नागिरी ,कोल्हापूर , आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.