For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडीत 5 नोव्हेंबरपासून आयुर्वेदिक ओपीडी सेवा

02:15 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत 5 नोव्हेंबरपासून आयुर्वेदिक ओपीडी सेवा
Advertisement
सावंतवाडी : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत विस्तारित आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिरातून या सेवेचा शुभारंभ होणार आहे.

या उद्घाटनाला आमदार दीपकभाई केसरकर, संस्थेचे संचालक प्रो. वैद्य प्रदीपकुमार प्रजापती, अधिष्ठाता प्रो. डॉ. सुजाता कदम, नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

पुढील आठवड्यापासून दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत नियमित ओपीडी सुरू राहणार आहे. हे केंद्र भाजी मंडई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर, बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहासमोर सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिरासह नियमित आयुर्वेदिक ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.