For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची ओपीडी सुरू; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; सिंधुदुर्गातील रुग्णांना मिळणार आयुर्वेदिक उपचार

05:55 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची ओपीडी सुरू  उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन  सिंधुदुर्गातील रुग्णांना मिळणार आयुर्वेदिक उपचार
Advertisement
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचारांची सुविधा आता सावंतवाडीत उपलब्ध होणार आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या विस्तार बाह्यरुग्ण विभागाचे (एक्स्टेंशन ओपीडी) उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी गोव्याला जाण्याची गरज कमी होणार आहे.

या ओपीडीच्या उभारणीसाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न केले. उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते.

Advertisement

मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यापुढील काळात या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुर्वेदिक उपचार, वैद्यकीय तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

यावेळी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपिस्ट गौरव कुडाळकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.