कोकण रेल्वेविरुद्धच्या साखळी उपोषणाला सावंतवाडी ऑटो रिक्षा चालक सेनेचा पाठिंबा
मिहीर मठकर यांच्याकडे निवेदन सादर करीत दर्शवला पाठींबा
कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणा-या अन्यायाविरुध्द तसेच बंद केलेल्या रेल्वे गाडयांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरुध्द साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी ऑटो रिक्षा चालक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवत मिहीर मठकर यांच्याकडे निवेदन सादर केलेय . सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची होणारी गैरसोय तसेच अतिरिक्त रेल्वे गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे या निवेदनात केलीय . आणि या मागणीचे निवेदन त्यांनी २६ जानेवारीला कोकण रेल्वेविरुद्ध साखळी उपोषण छेडणाऱ्या मिहीर मठकर यांच्याकडे सुपूर्द करून या उपोषणाला त्यांनी पाठिंबाही दर्शवलाय .