For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅडमिंटन स्पर्धेत सावनी, समन्यु, विजेते

10:10 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅडमिंटन स्पर्धेत सावनी  समन्यु  विजेते
Advertisement

अनिका नायक उपविजेते

Advertisement

बेळगाव : हुबळी येथील मंजुनाथ पाटकर बॅडमिंटन अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय खुल्या शटल बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात सावनी मायघोरने बेंगलोरच्या नागप्रज्ञाचा, तर 11 वर्षाखालील गटात शमन्यु देशपांडेने अरोहनचा पराभव करून विजेचे पटकाविले. मुलींच्या गटात अनिका नायकला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.  हुबळी येथे एनएमबीए बॅडमिंटन अकादमीच्या सभागृहात खेळविण्यात झालेल्या राज्यस्तरीय मंजुनाथ पाटकर बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या बीडीबीए क्लबच्या बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला होता. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात बेळगावच्या सावनी मायघोरने उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवानीचा 15-8,15-9 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सावनीने नागप्रज्ञाचा 15-8, 15-9, अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद फटकाविले. 11 वर्षाखालील मुलांच्या गटात समन्यु देशपांडेने उपांत्य फेरीच्या सामन्यात मयांकचा 15-13, 8-15, 15-12 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात समन्यु आरोहनचा 15-7, 15-10 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात अंतिम सामन्यात श्रावणीने अनीकाचा 15-11,15-12 असा गुण फरकाने पराभव केला. अनीकाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिन्ही स्पर्धकांना एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर, व संघटनेचे सचिव अशोक पाटील यांची मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.