For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला

07:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला
Advertisement

फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर : अंबानी-अदानी यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

हरियाणाच्या हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या 2025 च्या श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. 39.6 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर त्यांचा भारतातील सर्वात श्रीमंतांमध्ये क्रमांक लागतो. ही यादी गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. सावित्री जिंदाल आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 48 व्या क्रमांकावर आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, फोर्ब्सकडून अब्जाधीशांची (ज्यांची एकूण संपत्ती किमान 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे) यादी 2025 जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 35.5 अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच, 6 महिन्यांत सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 4.1 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींची एकूण संपत्ती 9 टक्क्यांनी कमी होऊन 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 88 लाख कोटी रुपये झाली आहे. मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 97 लाख कोटी रुपये होती.

Advertisement

 व्यवसाय 4 मुलांमध्ये विभागला

सावित्री जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली जिंदाल ग्रुपचे साम्राज्य स्टील, वीज, सिमेंट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात पसरलेले आहे. कंपनीची स्थापना त्यांचे दिवंगत पती ओम प्रकाश जिंदाल यांनी केली होती, ज्यांचे 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, व्यवसाय  विभागला गेला. त्यांचा मुलगा सज्जन जिंदाल मुंबईस्थित जेएसडब्ल्यू स्टील, जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडब्ल्यू पेंट्सचे प्रमुख आहेत. 2023 मध्ये त्यांनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर सार्वजनिक केले. 2024 मध्ये, त्यांनी चीनच्या एसएआयसी मोटरची उपकंपनी असलेल्या एमजी मोटर इंडियामध्ये 35 टक्के हिस्सा विकत घेऊन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विस्तार केला. नवीन जिंदाल, जिंदाल दिल्लीत स्टील अँड पॉवरचे व्यवस्थापन करतात.

Advertisement
Tags :

.