For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Investment Planning: गुंतवणूकीचे नियोजन करताना, लक्षात घ्या काही विशेष नियम..

03:48 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
investment planning  गुंतवणूकीचे नियोजन करताना  लक्षात घ्या काही विशेष नियम
Advertisement

या बाजूला काढलेल्या खर्चालाच बचत किंवा शिल्लक म्हणतात

Advertisement

By : सागर कांबळे

कोल्हापूर : दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नियमित कमाईमधून आवश्यक गरजा पूर्ण करणारा खर्च बाजूला काढला जातो. या बाजूला काढलेल्या खर्चालाच बचत किंवा शिल्लक म्हणतात. याला इंग्रजीमध्ये सेव्हींग असेही म्हटले जाते. हीच बचत भविष्यातील खर्चासाठी उपयोगी येते.

Advertisement

यामध्ये मुलांचे उच्च शिक्षणासाठी, लग्नसमारंभ, औषधोपचार, आदीसाठी उपयोगी पडते. मात्र या बचतीमधून भविष्यात अधिकची कमाई मिळावी यासाठी शिस्तबद्ध व अधिकृत असे गुंतवणुकीचे नियोजन असणे तितकेच आवश्यक आहे. या संदर्भात आजपासून आपण नियमितपणे गुंतवणूक, गुंतवणुकीचे विविध प्रकार, सुरक्षित गुंतवणूक, असुरक्षित गुंतवणूक या बाबीचा उलगडा गुंतवणुकीचे नियोजन करताना या सदरामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लक्षात घेण्याचे काही विशेष नियम :

१. बचत नियमित करणे आवश्यक आहे.
२. बचत ही दीर्घकाळासाठी करण्याची गरज आहे.
३. आपली गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता ती अनेक प्रकारे करावी.
४. बचत करत असताना ध्येय निश्चित केलेले असावे.
५. गुंतवणूक केल्यानंतर त्यावर आपले नेहमी लक्ष असणे गरजेचे असते.
६. बचत केलेल्या योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी.
७. बचत केलेल्या रक्कमेतूनच गुंतवणूक करावी, कर्ज काढून करु नये.
८. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसारच गुंतवणूक करावी.
९. नुकसान सहन करण्याची क्षमताही आपल्याकडे असायला हवी.
१०. निवृत्तीच्या वेळीच उत्पन्नाची योजना आखावी.

Advertisement
Tags :

.