For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी नेत्यांवर भडकले सौदीचे युवराज

06:48 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी नेत्यांवर भडकले सौदीचे युवराज
Advertisement

भेट घेण्यास दिला नकार : आसीम मुनीर यांना केले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाध

येमेनमधील बिघडती स्थिती आणि क्षेत्रीय सुरक्षेवरून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियात तणावाची स्थिती आहे. येमेनमध्ये दक्षिण फुटिरवादी गट सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिलने (एसटीसी) अलिकडेच हदरामौत आणि महरा प्रांतांच्या मोठ्या हिस्स्यावर कब्जा केला आहे. हा गट युएईकडून समर्थनप्राप्त आहे. सौदी अरेबियाने युएईला येमेनमधून स्वत:चे सैन्य मागे घेण्याचा इशारा दिला आहे. तर एसटीसीने सौदी अधिकाऱ्यांच्या विमानाला 1 जानेवारी रोजी एडनच्या विमानतळावर उतरू दिले नाही. तर दुसरीकडे युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सौदीचे  युवराज मोहम्मद बिन सलमान हे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.

Advertisement

युएई अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख मुनीर किंवा अन्य कुठल्याही नेत्याची भेट घेण्यास नकार दिला आहे. येमेनमध्ये युएईने पाठविलेल्या शस्त्रास्त्रांच्या खेपवर सौदीच्या हवाई हल्ल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी नूरखान वायुतळावर युएईच्या अध्यक्षांचे स्वागत केले होते. युएईच्या अध्यक्षांच्या दौऱ्यावरून सौदी नाराज होऊ नये असा प्रयत्न मुनीर यांचा होता, याचमुळे ते युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेण्यासाठी रियाध दौऱ्याचे नियोजन करत होते.

पंतप्रधान बदलण्याचे प्लॅनिंग

सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानी सैन्यप्रमुख किंवा तेथील कुठल्याही नेत्याची भेट घेण्यास नकार दिल्याने आसीम मुनीर यांची फजिती झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्या मरियम नवाज सध्या दुबईत आहेत आणि युएई सरकारला भेटत आहेत. युएईचे अध्यक्ष नाहयान यांनी मुनीर यांच्यावर मरियम यांना पाकिस्तानचे पंतप्रधान करण्यासाठी दबाव टाकावा असा प्रयत्न नवाज यांचा सुरू आहे.

Advertisement
Tags :

.