For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेपासून अंतर, रशियाशी सौदीची जवळीक

06:33 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेपासून अंतर  रशियाशी सौदीची जवळीक
Advertisement

ट्रम्प यांच्या वैरानंतर पुतीन यांच्याकडे सलमान यांची धाव

Advertisement

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान केवळ सैन्यकारवाईच नव्हे तर कूटनीतिही नवे वळण घेत आहे. याच बदलत्या स्थितीत सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या फोन कॉलने जागतिक राजकारणात नवे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे सौदी-अमेरिकेच्या संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली असताना ही चर्चा झाली आहे.

ट्रम्प यांनी अलिकडेच एका जाहीर व्यासपीठावरून युवराज सलमान यांच्यासंबंधी अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली होती. सौदी नेतृत्व आता माझ्या दबावात आहे आणि त्यांना ‘चांगले वागावे’ लागेल असे संकेत ट्रम्प यांनी दिले होते. या वक्तव्यामुळे कूटनीतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सौदी अरेबियाने अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरीही त्यानंतर उचललेली पावले खूप काही सांगणारी आहेत.

Advertisement

याच संदर्भात पुतीन आणि सलमान यांच्यात झालेल्या चर्चेकडे पाहिले जातेय. दोन्ही नेत्यांनी मध्यपूर्वेत वेगाने बिघडणाऱ्या स्थितीवर विस्ताराने चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी इराणसोबत जारी संघर्ष, जीवितहानी आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली. सौदी अरेबियाचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय सुरक्षेसोबत उभे असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी पुतीन यांनी दिला.

ओपेक प्लसमध्ये सहकार्य वाढविण्यावर जोर

ऊर्जा सुरक्षा या चर्चेच्या केंद्रस्थानी होती, इराण युद्धामुळे तेलपुरवठा आणि सागरी मार्गांवरील धोका वाढल्याने जागतिक बाजारात अस्थिरता येत आहे. अशास्थितीत दोन्ही देशांनी ओपेक प्लस संरचनेच्या अंतर्गत सहकार्य आणखी मजबूत करण्यावर जोर दिला, जेणेकरून तेलाच्या किमती नियंत्रित ठेवता येतील आणि बाजारात संतुलन राहिले. दोन्ही नेत्यानी सैन्य तोडग्याऐवजी कूटनीतिक मार्गावर जोर दिला आहे. तसेच तत्काळ युद्धविराम आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त केली. ही भूमिका अमेरिकेच्या वर्तमान आक्रमक रणनीतिपेक्षा काहीशी वेगळी दिसून येते.

सौदीच्या बदलत्या विदेश धोरणाचा संकेत

हा केवळ एक फोन कॉल नव्हे तर सौदी अरेबियाच्या बदलत्या विदेश धोरणाचा संकेत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. दीर्घकाळापर्यंत अमेरिकेचा घनिष्ठ सहकारी राहिलेला सौदी अरेबिया आता संतुलनाची रणनीति अवलंबू पाहत आहे. तो एकीकडे अमेरिकेसोबत संबंध राखू इच्छितो, परंतु दुसरीकडे रशिया आणि चीनसारख्या जागतिक शक्तींसोबतही स्वत:चे संबंध मजबूत करत आहे.

Advertisement
Tags :

.