For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्येंद्र जैन पुन्हा तिहार कारागृहात

06:11 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्येंद्र जैन पुन्हा तिहार कारागृहात
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आत्मसमर्पण, नियमित जामीन नाकारला

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सोमवारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. गेल्या नऊ महिन्यांपासून ते तुरुंगाबाहेर होते. नियमित जामीन मिळण्यासाठी जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना तातडीने आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याने सोमवारी रात्रीच ते तिहार कारागृहात हजर झाले होते.

Advertisement

सत्येंद्र जैन सध्या प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर होते. सोमवारी न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला. आता त्यांची होळी तुऊंगातच साजरी होणार आहे.

Advertisement
Tags :

.