मळेवाड काळोबा मंदिरात २२ एप्रिलला सत्यनारायण महापूजा
12:35 PM Apr 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
Advertisement
मळेवाड जकातनाका येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान, श्री देव काळोबा.हाकेला धावणारा म्हणून या देवतेची ख्याती असून,प्रतिवर्षी प्रमाणे मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले असून,सकाळी मंदिरात धार्मिक विधी,दुपारी ब्राह्मण भोजन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती,तीर्थप्रसाद,सायंकाळी स्थानिक भजन,तसेच रात्रौ ठीक ८,३० मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे( कुडाळ) यांचा " वैरी झाला धनी कुंकूवाचा " हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन मुरकरवाडी ग्रामस्थ व काळोबा कला क्रीडा मंडळ यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement