महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अखेर सत्यजित पाटलांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर ! 'हातकणंगले'मध्ये नविन ट्विस्ट; राजू शेट्टी यांची राजकिय कोंडी

02:09 PM Apr 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
Satyajit Patil
Advertisement

संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या हातकणंगले मतदारसंघामध्ये आज अखेर शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोंडी वाढवली. या जागेवर शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील सरूडकर यांना तिकिट देऊन आपणही हातकणंगेलसाठी तयार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने दाखवून दिले आहे. सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे.

Advertisement

पहा VIDEO >>> शिवसेनेवरील माझ्या निष्ठेमुळेच मला पक्षाचे तिकीट- सत्यजित पाटील

Advertisement

शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा चालु होत्या. राजू शेट्टी यांच्य़ा महाविकास आघाडीमधील प्रवेशाच्या बदल्यात हातकणंगले मध्ये उमेदवार दिला जाणार नाही अशी काहीशी ऑफरही त्यांना देण्यात आली होती.

पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठींबा विनाअट हवी असल्याने त्यांनी महाविकास आघाडीमधील प्रवेश नाकारला. पण सांगली कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटल्यात जमा असताना शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर करून राजू शेट्टी यांना मोठा शह दिला आहे.

हातणंगलेच्या जागेसाठी माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सत्यजित आबा सरूडकर यांच्यामध्ये चुरस लागली असताना शेवटी सत्यजित पाटलांनी यामध्ये बाजी मारली आहे. सत्यजीत पाटील यांच्या उमेदवारीमुळे शाहूवाडी तालुक्याचे खासदारकीच्या तिकिटाचे स्वप्न पुन्हा एकादा पुर्ण झाले आहे.

 

Advertisement
Tags :
Raju ShettySatyajit PatilShivSena ShivSena
Next Article